भुसावळ । भारिप बहुजन महासंघाची जिल्हास्तरीय बैठक शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये भारिप बहुजन महासंघाची जिल्हाभर सभासद नोंदणी अभियान राबविण्याचे ठरले. महासंघातर्फे जिल्हाभरात विविध कार्यकारणी लवकरच तयार करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील ज्वलंत विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुकानिहाय मेळावे घेण्यात येणार असून यामाध्यमातून सर्व सामान्य जनतेला भेडसावणार्या समस्या जाणून घेणार आहे. कार्यकर्त्यांनी या समस्या जाणून घेत सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सोनवणे यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी बैठकीत जिल्हा सरचिटणीस प्रभाकर इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हाउपाध्यक्ष बुधा सुरवाडे, तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर, रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, जामनेर तालुकाध्यक्ष काशिनाथ गायकवाड, यावल तालुका सरचिटणीस हमीद शाह आदी उपस्थित होते.