भुसावळ । भारिप बहुजन महासंघातर्फे तालुका बैठक शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे होते. यावेळी तालुकाध्यक्षपदी अॅड. मनोहर सपकाळे यांची तर युवा तालुकाध्यक्षपदी प्रमोद बावस्कर यांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा संघटक शिवाजीराव टेंभुर्णीकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर इंगळे, विश्वनाथ मोरे, संतोष सुरवाडे, संगम निकम, समाधान भारसके, उमेश तायडे, बाळू शिरतुरे, काशिनाथ गायकवाड, महेंद्र सुरळकर, संजय कांडेलकर, अमित शाह, महेश तायडे आदी उपस्थित होते. निवड झाल्याबद्दल अॅड. सपकाळे व बावस्कर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.