मुक्ताईनगरात बैठक ; आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा -दशरथ भांडे
मुक्ताईनगर- वंचित बहुजन आघाडीच्या मेळावा नियोजनासाठी मुक्ताईनगर शहरातील भारीपाच्या कार्यालयात माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. याप्रसंगी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी कामाला लागावे, असा सल्ला भांडे यांनी दिला. प्रसंगी नितीन कांडेलकर यांच्यासह भुसावळ तालुक्यातील अशोक कोळी, सुदाम सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारीपात प्रवेश केला. यावेळी बहुजन वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सुदाम सोनवणे यांची निवड करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा
प्रसंगी माजी मंत्री दशरथ भांडे, जळगाव पक्ष निरीक्षक शरद वसतकर, भारीपा जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली. मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी कोळी महासंघ तसेच 12 ते 15 गावातील आजी-माजी सरपंच यांनी वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिला.
यांची होती उपस्थिती
मुक्ताईनगर आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष रवींद्र केशव बोदडे, आर.के.गणेश, मनोज तायडे, विजय थाटे, सुदाम सोनवणे, विक्रम हिरोळे, अमर बोदडे, प्रमोद भालेराव, अॅड.दीपेश वानखेडे, महेंद्र हेरोळे, शैलेंद्र वानखेडे, संदीप सुरवाडे, दिनकर सुरवाडे, युवक जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव दिनेश ईखारे, प्रमोद इंगळे, विश्वनाथ मोरे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर, एस.एस.तायडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष समाधान गवई, सरचिटणीस भिकाजी आसलकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप पोहेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत लहासे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा राजश्री ससाणे, धनगर समाजाच हभप संतोष चिकटे महाराज, युवक तालुकाध्यक्ष संजय धुंदले, तालुका संघटक चंदुभाऊ सवर्णे, सरचिटणीस सतीश वाकोडे, समता सैनिक दलाचे तालुका प्रमुख साहेबराव धुंदले, मुक्ताईनगर शहर अध्यक्ष सुमित बोदडे, बाळू इंगळे, गोपाळ धुंदले, भरत डोंगरे, सुनील गायकवाड, गयाबाई लहासे, राजु धुंदे, प्रकाश धुंदे, सुलताने बुवा, राहुल इंगळे, बाळकृष्ण वाघ आदींची उपस्थिती होती.