भारीप बहुजन महासंघाच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी विनोद सोनवणे

0

भुसावळ- भारीप बहुजन महासंघाच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी विनोद सोनवणे यांची तर जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रमोद रामदास इंगळे यांची भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशाने निवड करण्यात आली. ही निवड महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे व जिल्हा निरीक्षक शरद वसतकर यांनी केली आहे. नवीन जिल्हाध्यक्ष निवडीने कार्यकर्ते व पदाधिकारी नव्या उमेदीने काम करतील यामुळे वंचित जाती-जमातीच्या घटकांचे एकत्रीकरण होवून नक्कीच पक्षास जिल्ह्यात पोषक वातावरण निर्माण होईल, असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. नूतन पदाधिकार्‍यांवर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.