जळगाव । सर्व जाती धर्मासाठी रोप्य महोत्सवी वर्ष 2017 अंतर्गत वनिता विश्व महिला मंडळा च्या वतीने महिला दिना निम्मिताने भारुड ,पोवाडे स्पर्धेचे आयोजन शहरातील कांताई सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात वनिता विश्व महिला मंडळाच्या सहकार्यांनी गणेश वंदना, पोवाडे सादर करून स्पर्धेला सुरुवात केली. या वेळी शहरातील प्रसिद्ध असलेल्या महिला भजनी मंडळाच्या वतीने सामाजिक, अध्यात्मिक पारंपारिक पोवाडे सादर करण्यात आले होते.
प्रमुख मान्यवर उपस्थित
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार स्मिता वाघ, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, नगरसेवक सीमा भोळे, कल्पना पाटील,रमेलाबेन कोटारी,जैन स्पोट चे सचिव फारूक शेख यांच्या हातून कार्यक्रमाचे उत्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी देखील महिला मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेले. भारुड पोवाड्याच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या वेळी संपूर्ण कांताई सभागृह महिलाच्या उपस्थिती मध्ये भरला होता. पोवाडे सादर करणार्या स्पर्धकांना नागरिकान कडून ताळ्या वाजून प्रोत्साहन देण्यात येत होते.
स्त्री जन्माचा खडतर प्रवास नाट्यमय स्वरुपात
स्त्री जातीच्या आयुष्यातील महितीचा उलगडा या प्रसंगी पाडण्यात आला.महिला च्या आयुष्यातील संघर्ष कसा असतो. तो पोवाड्याच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांनी मांडला आहे. महिला मंडळाच्या वतीने पोवाड्याची स्वयमनिर्मिती रचना करण्यात आली होती. संगीत बध्य तालात भारुडे , पोवाडे महिला मंडळानी सादर केले. स्त्री जन्माचा खडतर प्रवास नाट्यमय स्वरुपात महिला सहकार्यांनी सादर केले.
संगीतबध्द पोवाडे, भारुडांचे सादरीकरण
भजनी मंडळा सह महिला बचत गट या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.या मध्ये हरी भजन ग्रुप, स्फूर्ती महिला मंडळ ,ओमकारेश्वर महिला भजनी मंडळ, सखी माउली महिला बचत गट,माहेश्वरी बहुद्देशीय महिला भजनी मंडळ,तेली समाज महिला मंडळ, मुक्ताई भजनी मंडळलायन्स क्लब महिला मंडळ यांनी सहभाग घेतला होता. शिवाजी महाराजांनी महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने केलेल्या कार्याची महिती पोवाडे भारुडाच्या माध्यमातून सांगण्यात आले. परीक्षक म्हणून विनोद ढगे यांनी काम पाहिले तर यशस्वी करण्यासाठी वनिता विश्व महिला मंडळाच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.