भालचंद्र देशमुख यांना तलवार पकडण्याचा मान

0

चाळीसगाव। येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत पीर मुसा कादरी बाबा उर्फ बमोशी बाबा यांचा सालाबाद प्रमाणे उर्स दि 12 एप्रिल 2017 पासून सुरु होत असून या वर्षी तलवार पकण्याचा मान भालचंद्र देशमुख यांना मिळणार आहे. तलवार मिरवणुकीच्या सुरुवातीला राष्ट्र संत भैयुजी महाराज व झी 24 तास चे उपसंपादक अजित चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी आमदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीवदादा देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. 12 एप्रिल 2017 रोजी संदल मिरवणूक तर 13 एप्रिल रोजी तलवार मिरवणूक निघेल.

तलवार हि तलवार भवन जुनी नगर पालिका येथून सायंकाळी 5 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत मिरवणुकीचे आयोजन केले आहे. तलवार चे दुवा (पढन) शहरे काजी नाजिमोद्दीन काजी यांचे हस्ते करण्यात येणार आहे तर धुनी पकडण्याचा मान विजय वसंतराव देशमुख यांना मिळणार आहे. या उर्स दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून या ठिकाणी डीवायएसपी अरविंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे लक्ष ठेऊन आहेत.

जिल्ह्यातील 10 व चाळीसगाव शहर व ग्रामीण चे पोलीस अधिकारी बाहेरील व चाळीसगाव शहर ग्रामीण पोलीस ठाण्याचे 210 कर्मचारी 50 होमगार्ड बंदोबस्त सांभाळणार आहे