यावल : तालुक्यातील भालशीव गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी सागर सुपडू सपकाळे (पिंप्री, ता.यावल) याच्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 24 ते 25 जून दरम्यान आरोपी सागर सपकाळे याने भालशीव गावातील अल्पवयीन मुलीस काहीतरी आमिष दाखवून व फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी पीडीतेच्या आईने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.