यावल : तालुक्यातील भालशीव शिवारात नवती व पिलबाग असलेल्या केळी बागेला आग लागल्यामुळे तीन लाखांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी एकावर संशय व्यक्त करण्यात आला. यावल पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
केळी उत्पादक आर्थिक संकटात
यावल शहरातील खिर्णीपुरा भागातील शेतकरी शेख अयुब शेख गुलाम रसूल यांनी शहरातील रहिवासी डॉ.रावते यांचे भालशीव शिवारात असलेले शेत गट क्रमांक 24 हे बटाईने केले आहे. या शेतात त्यांनी नवती व पील बाग केळीची लागवड केली होती व पाण्यासाठी ठिबक टाकली होतीफ या शेताला लागून विजय मिठाराम मंदवाडे (रा.यावल) या शेतकर्याचे शेत आहे या शेतकर्यांने शनिवारी दुपारी आपल्या शेत बांधावरील कचरा पेटवला होता तेव्हा या पेटविण्यात आल्या कचर्याच्या आगीने रौद्र रूप धारण केले व आग गट क्रमांक 24 मधील नवती व पिल बाग केळी मध्ये शिरली यात केळी बाग जळाली व ठिबक नळ्या जळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. याबाबत शेतकरी शेख अयुब शेख गुलाम रसूल यांनी यावल पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनंतर यावल पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला.