भालोदला दोघांना मारहाण : नऊ संशयीतांविरोधात गुन्हा दाखल

Beating two people in Bhalod : Crime against nine suspects यावल : तालुक्यातील भालोद येथील दोघांना नऊ जणांनी मिळून मारहाण केली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फैजपूर पोलिसात संशयीतांविरोधात गुन्हा
भालोद, ता.यावल येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गेट समोर शिवम विलास कराड (कोचूर) व भूषण अनिल नेमाडे (न्हावी) हे उभे असताना संशयीत मसा भालेराव, तुषार भालेराव, दीपक भालेराव, हर्षल भालेराव, बुवा भालेराव, रजनीकांत धोनी, राहुल भालेराव, गौरव भालेराव व आशुतोष भालेराव आदींनी दोघांना मारहाण केली. या प्रकरणी ललित वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसात वरील संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहेत.