यावल- तालुक्यातील भालोद येथील दिलीप गेंदू चौधरी (57) यांनी मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नवीन दत्त मंदिराजवळील रहिवासी दिलीप गेंदू चौधरी (57) हे दुपारी त्यांच्या गावालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यात गेले मात्र सायंकाळ होवूनही ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी सायंकाळी सहा वाजता गोठ्यात जावुन पाहिले असता चौधरी हे गळफास घेवून मृतावस्थेत आढळले. फैजपूर पोलिसात लिलाधर नारायण चौधरी यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बुधवारी सकाळी यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून भालोद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहेत.