भालोद महाविद्यालयात रासेयोतर्फे एकात्मतेची शपथ

0

यावल- तालुक्यातील भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय एकात्मता आठवडय़ाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत स्वयंसेवक, स्वयंसेविकांना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आशुतोष वर्डीकर यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

विविध विषयांवर केले मार्गदर्शन
देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करणार, तसेच कधी हिंसाचाराचा अवलंब न करतात सर्व धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, आर्थिक, राजकीय मतभेद शांततामय सांविधानिक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. प्राचार्य डॉ. अजयकुमार कोल्हे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.राकेश चौधरी, प्रा.डॉ.व्ही.पी.पावार, प्रा.डॉ.पी.एम. चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयो स्वयंसेवक, स्वयंसेविका तसेच मुबारक तडवी, तुळशिराम पाटील, श्री लोखंडे यांनी सहकार्य केले.