जळगाव । रामानंदनगर पोलिस ठाण्यातच शनिवारी रात्री 10 ते रात्री 3 वाजेच्या दरम्यानात मालमत्तेच्या वादावरुन दोन पोलीस भावांमध्ये वाजेच्या सुमारास जोरदार वाद होवून धिंगाणा घातला. दोन्ही भाऊ वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनाही जुमानत नसल्याने त्यांच्यातील वाद मिटविण्याठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना रामानंद पोलीस स्टेशनमध्ये धाव घ्यावी घेतली आणि त्यांनी दोन्ही पोलिस भावंडाची समजूत घातली. मात्र, दोन्ही भाऊ व त्यांच्या मुलांना चांगलेच भोवले असून. सहा जणांविरुध्द भाग 6 कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
एकमेकांना वाहिली शिव्यांची लाखोली
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लालसिंग पाटील व पांडुरंग पाटील या दोन्ही पोलिस कर्मचारी असलेल्या सख्या भावांमध्ये शनिवारी मालमत्तेच्या कारणावरुन वाद झाला होता. त्यातून एका जणाने दुपारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार केली त्यावरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.संध्याकाळी पुन्हा हा वाद उफाळून आला. दोघंही एकमेकाच्याविरुध्द तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यांच्यासोबत मुले व पत्नी या देखील आल्या. एकमेकाला ठार मारण्याच्या धमक्या लालसिंग व पांडुरंग या दोन्ही भावांमध्ये रात्री दहा वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात प्रचंड वाद झाला. एकमेकाला शिव्याची लाखोली वाहन्यासह र्खुच्या उचलून एकमेकाच्या अंगावर धावून जात होते. ठार मारण्याची धमकी त्यांच्याकडून दिली जात होती. पोलीस खात्यातीलच कर्मचारी असल्याने ठाणे अमलदार विजय निकुंभ, सहायक फौजदार गोपाळ चौधरी यांच्यासह उपस्थित कर्मचार्यांनी त्यांची समजूत घातली, मात्र ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते.
अधिकार्यांशी असभ्य वर्तन
दोन्ही भावंडांचा पोलीस ठाण्यात गोंधळ वाढत चालल्याचे पाहून ठाणे अमलदाराने पोलीस निरीक्षक बी.जी.रोहम यांना बोलावून घेतले. त्यांनीही समजूत घातली, मात्र डोक्यावरुन पाणी जात होते. रोहम यांनी डीवायएसपी सचिन सांगळे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी देखील दोघं भावंडाची समजूत घातली, मात्र त्यातील एका जणाने सांगळे यांच्याशीच असभ्य वर्तन केले. त्यामुळे सांगळे यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या कानावर हा प्रकार घातला. कराळे यांनी लागलीच पोलीस स्टेशन गाठले. 1 वाजेपर्यंत त्यांची समजूत घातल्यानंतर सर्वांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
यांच्यावर गुन्हे दाखल
गुन्हा दाखल झालेल्यामंध्ये हवालदार लालसिंग उदेसिंग पाटील, त्यांचा मुलगा कॉन्स्टेबल अरुण लालसिंग पाटील (दोन्ही नेमणूक धरणगाव पो.स्टे.), पांडुरंग उदेसिंग पाटील (नेमणूक एटीसी, जळगाव), त्यांचा मुलगा कॉन्स्टेबल चंद्रसिंग पांडुरग पाटील (नेमणूक धरणगाव पो.स्टे) या चार पोलिसांसह राहूल लालसिंग पाटील व सुनील पांडुरंग पाटील (सर्व रा.पिंप्राळा, जळगाव) यांचा समावेश आहे. दरम्यान, या सहा जणांविरूध्द रामनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. तर मध्यरात्रीपर्यंत हा धिंगाणा सुरू होता. अखेर पोलिसांनी दोन्ही भावडांची व नातेवाईकांची समजूत घालून त्यांना पोलिस ठाण्याबाहेर काढले.