पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गणरायाला घातली साद ; भक्तिमय आणि चैतन्यदायी वातावरणात गणरायाचे विसर्जन
ढोल-ताशाच्या गजरात शांततापूर्ण वातावरणात पार पडली मिरवणूक
धुळे । मागील 10 दिवसांपासून मुक्कामी असलेले गणरायांनी मंगळवारी भक्तांचा निरोप घेतला. सकाळपासूनच गणेश विसर्जनाचा उत्साह दिसून आला होता. ढोल-ताशांच्या गजरामध्ये गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तगण सकाळपासूनच तयारीत होते. साधारण दुपार पासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मागील अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची मंगळवारी 5 रोजी अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीने सांगता करण्यात आली. दहा दिवस बाप्पांची सेवा केल्यानंतर अकराव्या दिवशी बाप्पाला निरोप देताना अनेक गणेशभक्त भावूक झाल्याचे चित्र विसर्जनस्थळी दिसून आले. मानाचा खूनी गणपती सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास जुन्या धुळ्यातील खूनी मशिदीसमोर आल्यानंतर मुस्लीम बांधवांनी मशिदीतून खूनी गणपतीच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मानाचा गणपतीची व मोठ्या मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. रात्री 12 वाजून 45 मिनीटांपर्यंत मिरवणुका सुरू होत्या. सर्वात शेवटी अमर गणेश मंडळाचा गणपतींची विसर्जन झाले. त्यानंतर विसर्जन मिरवणुका संपल्या.
पोलीसांचा तगडा बंदोबस्त
आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे भरून आले होते. लाडक्या गणरायाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकूणच वातावरण भक्तिमय आणि चैतन्यदायी असे होते. जय गणेशच्या जयघोषाने आसमंत व्यापून गेला होता. गणेश विसर्जनासाठी नदी आणि तलावांमध्ये उतरणार्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेर्यासह पोलीस लक्ष ठेवण्यात आले होते. पुढच्या वर्षी लवकर ये अशी साद घालत भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप देत घरचा मार्ग धरला आहे. विसर्जन सुरळीत पार पडल्याने पोलिसांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.
कृत्रीम तलावाची व्यवस्था
पावसाने यंदा पाठ फिरविल्यामुळे पांझरा नदीचे पात्र कोरडठाक पडले होते. परिणामी, भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून मनपा प्रशासनातर्फे शहरातील आठ ठिकाणी भाविकांना विसर्जन करता यावे, यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी विसर्जनस्थळी ठेवलेल्या पाण्याचा मुर्तीला स्पश मनपा प्रशासनाने नियुक्त केलेल्या कर्मचार्यांकडे दिल्या. तसेच निर्माल्यही अस्ताव्यस्थ न फेकता घंटागाड्यांमध्ये टाकले.
शिंदखेड्यात जल्लोषात मिरवणूक
‘गणपती बाप्पा मोरया’, ’पुढच्या वर्षी लवकर या’,च्या गजरात गणराराचा निरोप घेण्रात आला. शहरासह तालूक्यात विसर्जनाचा जल्लोष दिसून आला. यंदा शहरातील अनेक मंडळांनी भव्य मूर्ती व विद्यूत रोषणाई वर भर दिला होता. तसेच काही गणेश मंडळांकडून सामाजिक जनजागृतीचे देखावे करण्रात आले होते. सकाळ पासूनच गणेश विर्सजनाची धावपळ गणेश मंडळांकडून होत होती. ढोल पथक तसेच मिरवणूकीची तयारी करण्यात मंडळाचे सदस्य मग्न होते. गांधी चौकातील अष्टविनायक गणेश मंडळ व कॉलनी परीसरातील विद्यासागर गणेश मंडळासह इतर मंडळाच्या गणेश विर्सजन मिरवणूकिला सायंकाळी 6 नंतर सुरूवात झाली. गुलालाची उधळण करीत ढोल ताश्यांच्या गजरात तापी नदी पात्रात गणरायाचे विर्सजन करण्यात आले. विर्सजन मिरवणूकीच्या मार्गावर श्रीं ची आरती करण्यात आली.
विसर्जनाला गालबोट; एकाचा बुडून मृत्यू
धुळे तालुक्यातील नदाणे येथील गावनदीच्या बंधार्यात गणेश विसर्जन करतांना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणार्या सोळा वर्षीर शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. चेतन नितीन पाटील असे रा मुलाचे नाव आहे. चेतनच्या अकस्मात मृत्यूने गावात शोककळा पसरली. गावातील सर्व गणेश विसर्जन मिरवणूकीच्या उत्साहावर विरजण पडले. वाजंत्री बंद करण्यात येऊन अवघ्या दहा मिनिटात पाझर तलावात गणपती विसर्जन करण्यात आले. चेतन व त्यांचे मित्र नंदाणे पासून सातशे मीटर अंतरावर उत्तरेकडे असलेल्रा सोनगीर रस्त्याजवळील गावनदी व गुळनदीच्या संगमावरील महादेव मंदिर आहे त्रा ठिकाणी विसर्जनासाठी गेले होते. बांधावर उभे राहून गणेश विसर्जन करतांना चेतन पाण्यात पडला. गाळात पाय रुतल्याने त्याला पाण्याबाहेर रेणे अशक्य झाले. सोबतच्रा मित्रांनी वाचविण्राचा प्रयत्न केला मात्र त्रांना वाचविण्रात रश आले नाही. मित्रांकडून ही माहिती गावात पोहोचविण्रात आली. त्रानंतर रविंद्र शिवराम पाटील यांनी पाण्यात उडी मारून चेतनला बाहेर काढले. त्याला सोनगीर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरणकुमार निकवाडे यांनी चेतनला मृत घोषित केले. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. चेतनचे शेतकरी वडील नितीन मगन पाटील व आई वैशाली व 6 वीत शिकणारा भाऊ रांचा अकांत पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.