सूरजपूर : बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच सूरजपुरमध्ये लहान भावासमोर 7 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या बाहेर खेळणार्या मुलीला 10 रूपयाची नोट दाखवून आरोपीने तिला आपल्या खोलीत बोलावून घेत हे दुष्कृत्य केले.
शेजारी राहणार्या लोकांना जेव्हा लहान मुलीवर बलात्कार झाल्याचे समजले तेव्हा त्यांनी आरोपीला बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो एका ठिकाणी शिपाई म्हणून कार्यरत होता. मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून तिची आई कामासाठी घराबाहेर असते. आरोपी हा पीडित मुलीच्या मामाच्या घराशेजारी राहतो. मुलगी आपल्या मामाकडे गेली असताना आरोपीने तिला पैशाचे आमिष दाखवत तिच्या छोट्या भावासमोरच तिच्यावर बलात्कार केला.