भावासह भाच्याची हत्या करणार्‍या दोघा आरोपींची कोठडीत रवानगी

0

भुसावळ- पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून चारठाण्यात भाच्याची हत्या करणार्‍या आरोपीसह किरकोळ कारणातून भुसावळात भावाची हत्या करणार्‍या आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

खुनी मामाची कोठडीत रवानगी
मुक्ताईनगर-
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशयातून भाच्याची मामाने जिलेटीन कांड्याचा स्फोट घडवून 6 जून रोजी चारठाण्यात हत्या केली होती. या घटनेत आकाश वरखेडे याचा मृत्यू झाला होता तर या प्रकरणी आरोपी तथा मामा जनार्दन विटोकार याला अटक केल्यानंतर रविवारी पोलिसांनी मुक्ताईनगर न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवार, 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक नीलेश सोळंके पुढील तपास करत आहेत.

भावाचा खून : आरोपी कोठडीत
भुसावळ-
शहरातील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी योगेश प्रल्हाद पाटील (34) यांचा त्यांचा लहान भाऊ स्वप्नील पाटील (28) याने चाकूचे वार करून खून केला होता. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास शुक्रवार, 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दोन्ही भावांमध्ये झालेल्या वादातून स्वप्नीलने योगेशवर चाकूने वार केल्याने योगेशचा मृत्यू झाला होता.