भाविकांवर काळाचा घाला; सोलापुरातील पाच जण अपघातात ठार !

0

सोलापूर: देवदर्शनावरून परतताना सोलापूरातील पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गुलबर्गाजवळील असलेल्या आळंद येथे आज मंगळवारी पहाटे अपघात झाला. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूरच्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रावण सोमवारनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर गावातील एक कुटुंबीय देवदर्शनासाठी दक्षिण भारतात गेले होते. देवदर्शन आटोपून घराकडे परत येत असताना गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथे काळाने घाला घातला.