जळगाव। महापौर नितीन लढ्ढा यांनी आज दिवसभर त्यांची नियोजीत कामे केली. राजीनामा देण्याचे आदेश त्यांना मिळाल्यावर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून भेटीची वेळ मागितली होती. परंतु, निंबाळकर हे नियोजीत कार्यक्रमासाठी गेल्याने संध्याकाळी भेट घेण्याचे सांगितले होते. यानुसार दिवसभारातील कामे संपवून महापौर लढ्ढा हे जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या मोजक्या समर्थंकासोबत हजर झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत स्वीकृत नगरसेवक जितेंद्र मुंदडा, शरद तायडे आदी मोजकेच कार्यकर्त्यांनासोबत परिचीत हसतमुख चेहर्याने जिल्हाधिकार्यांच्या दालनात प्रवेश केला.
जिल्हाधिकार्यांचे सौजन्य
जिल्हाधिकार्यांच्या दालनात निंबाळकर यांनी महापौर लढ्ढा यांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडत दिड महिन्यात प्रशासन व महापौरांच्या शहराचा कायापालट कसा होऊ शकतो याचे उत्तम उदारहण असल्याचे सांगून लढ्ढा यांच्या कार्याचा गौरव केला. गोलीणी मार्केटची स्वच्छता करतांना महापौर जातीने हजर असल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. तसेच अतिक्रमण संदर्भांत महापौरांनी कधीच फोन केला नसल्याचे स्पष्ट करत लढ्ढा हे पहिले महापौर असल्याचे सांगितले. गाळ्यासंदर्भात लढ्ढा यांनी गाळेसंदर्भात क्लेषकारक निर्णय असल्याने शासनाकडून निर्णय येण्याची वाट पहाण्यास सांगितले. लढ्ढा हे राजीनामा दिल्यानंतर भावूक झाले होते. त्यांना दोन शब्द बोलणेही अवघड जात होते. मावळत्या महापौरांना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर हे स्वतः त्यांच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली उतरून आले होते.
काय म्हणाले नितीन लढ्ढा ?
शहर महापालिका जळगावचा गेल्या दीड वर्षांपासून खान्देश विकास आघाडीतर्फे मी महापौर पदावर आरूढ होतो. खान्देश विकास आघाडीचे आदरणीय नेते सुरेशदादा जैन यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे मी या शहरासाठी थोडफार काम करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या या गेल्या दीड वर्षांतील महापौरादाच्या वाटचालीत मला पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबरावजी पाटील, माजी मंत्री एकनाथरावजी खडसे तसेच जिल्हाधिकारी निंबाळकर साहेब, माजी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, सरकारी व निमसरकारी कार्यालयातील इतर पदाधिकारी, मनपातील खान्देश विकास आघाडीतील माझे सर्व नगरसेवक सोबती, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या माझ्या नगरसेवक मित्रांना मला मनापासून जळगाव शहराच्या विकासासाठी सहकार्य व प्रोत्साहितही केले.
जळगाव शहरातील सर्व सन्माननीय नागरिकांनी तसेच उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर्स, समाजिक कामकाज करणार्या संस्थांनी (एनजीओ) मला सतत पाठिंबा दिला आणि प्रोत्साहित केले त्यामुळे मी या शहरासाठी काही करू शकलो. माझ्या या दीड वर्षांच्या महापौरपदाच्या वाटचालीत मला शहरातील सर्व वृत्तपत्रे, त्यांचे संपादक, उपसंपादक, वार्ताहर, प्रेस फोटोग्राफर्स तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयातूनही बहुमोल सहकार्य मिळाले. त्यामुळे काम करण्याची नवीन उमेद मिळत गेली. अजूनही खूप काही करायचे बाकी आहे. तरी असेल त्या क्षमतेत माझ्याने होईल तेवढं कार्य मी या महानगरासाठी सुरू ठेवेल.मी सदैव आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. माझ्या दीड वर्षांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात खालील कामे मी माझ्यापरीने आपल्या सगळ्यांच्या सहकार्यांने करू शकलो याचा
मला आनंद आहे.
केलेल्या कामांची जंत्री केली सादर
मनपाची आर्थिक परिस्थिती नसतांना बजरंग बोगदा याला समांतर दोन बोगदे निर्माण करणे कामी रू. 3.75 लक्ष खर्च करून नागरिकांची होणारी गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची मदत घेवून जिल्ह्यात नाही अशा सुंदर, भाऊंचे उद्यानाची निर्मिती करून विनामूल्य प्रवेशासाठी खुले केले.मेहरूण तलावाची गळती रोखून त्याचे खोलीकरण, मजबूतीकरण, व सौंदर्यकरण हे मोठे काम मनपाचा एकही रूपया खर्च न करता शहरातील उद्योजक व संस्थांच्या मदतीने काम केले. तलावाच्या सुशोभिकरणासाठी 3.5 कोटी रूपये खर्च करून मनपातर्फे 9 मीटर रूंद रस्त्याच्या निर्मितीची लवकरच सुरूवात होईल.गांधी उद्यान, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या सहकार्याने नूतनीकरण करून येत्या 2 ऑक्टोबर रोजी लोकार्पण होणार.मनपाच्या उत्पन्नात वाढ होवून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत किंवा रास्त फीमध्ये शिक्षण घेण्याची व्यवस्था होण्याच्या दृष्टीने शाळा क्र. 3 स्व. रामदास पाटील सेवा स्मृती ट्रस्ट व शाळा क्र. 45 लेवा एज्युकेशन संस्था, भोईटे शाळा, अनुभूती स्कूल या संस्थांना देवून शिक्षणाचे उद्दिष्टे साध्य केली. महापालिकेची आरोग्यसेवा वाईट स्थितीत होती. पगारावर मात्र मोठ्या प्रमाणावर होत असलेला खर्च पहाता पिपल्स बँक संचलीत स्व. रामदास पाटील सेवा स्मृती ट्रस्टला देण्याचा निर्णय मार्गी लावला.मनपाचा एकमात्र जलतरण तलाव अनेक वर्षांपासून बंद होता. त्यासंदर्भांत धोरणात्मक निर्णय घेवून सर्व सुसज्ज असा जलतरण तलाव येत्या 6 महिन्यात नागरिकांसाठी खुला होईल. शास्त्रीटॉवरचे नुतनीकरण लोकसहभागातून, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या पुढाकाराने आजमितीस पुर्णत्वाकडे आहे. जळगाव रेल्वे स्थानकाजवळील वाहतुकीची कोंडी पाहता जिल्हाधिकारी तसेच रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी रस्ता खुला. रेल्वे उड्डणपुलाचा विषय मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा.उच्चन्यायालयाचा निकाल लागूनही वर्षानुवर्षे पोलिस अधीक्षकांच्या ताब्यात असलेली रस्त्यांची जागा ताब्यात घेवून त्या जागांचा विकास लोकसहभागातून करण्याचा निर्णय झालेला आहे.शहराच्या मध्यभागी असलेले ट्रॅफिक गार्डन व सिव्हील सेंटरच्या जागेचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने ट्राफिक गार्डनचा विकास पोलिस विभागाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय झालेला आहे. तर शहरातील विविध चौक सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विकसित करून शहराच्या सौंदर्यात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. (महेश चौक/डीमार्ट चौक/अजिंठाचौक, इत्यादी) जळगाव शहर मनपाच्या मालकीच्या व्यापारी संकुलाल गाळेधारकांना प्रश्न महापालिकेचे आर्थिक हीत जोपासताना गाळेधारकही विस्थापीत होणार नाहीत. यासाठी पाठपुरावा केला.महानगरपालिकेचे अनुदान रू. 10 कोटी शासन जमा झाल्यानंतर परत आणले. तसेच ना.गिरीषभाऊ यांच्या माध्यमातून मा.मुख्यमंत्री महोदय यांचेकडे वारंवार पाठपुरावा करून रु. 25 कोटीची मनपाकरीता आर्थिक मदत मिळविली. सागरपार्क येथील जागेसाठीसर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असलेला निकाल लक्ष घालून मनपाच्या बाजून मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याच सागरपार्कमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करून निसर्गरम्य आवारात जॉगींग ट्रॅक, बसण्यासाठी बेंचेस व हायमास लाईट्स सारख्या इतर सोयींनी संपन्न अशा अनेक बाबींसाठी लागणार्या 70-75 लक्ष रु. चा प्रस्ताव अंतीम टप्प्यात आहे.
कार्यकाळाचा गौरव
दिवसभरातील कामे संपवून महापौर लढ्ढा हे स्वीकृत नगरसेवक जितेंद्र मुंदडा, शरद तायडे आदी मोजकेच कार्यकर्त्यांसोबत हसतमुख चेहेर्याने जिल्हाधिकार्यांच्या दालनात प्रवेश केला. जिल्हाधिकार्यांच्या दालनात निंबाळकर यांनी महापौर लढ्ढा यांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडत दिड महिन्यात प्रशासन व महापौरांच्या शहराचा कायापालट कसा होऊ शकतो याचे उत्तम उदारहण असल्याचे सांगून लढ्ढा यांच्या कार्याचा गौरव केला. गोलाणी मार्केटची स्वच्छता करतांना महापौर जातीने हजर असल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. तसेच अतिक्रमण संदर्भांत महापौरांनी कधीच फोन केला नसल्याचे स्पष्ट करत लढ्ढा हे पहिले महापौर असल्याचे सांगितले. गाळ्या संदर्भात लढ्ढा यांनी गाळेसंदर्भात क्लषकारक निर्णय असल्याने शासनाकडून निर्णय येण्याची वाट पहाण्यास सांगितले. लढ्ढा हे राजीनामा दिल्यानंतर भावूक झाले होते. त्यांना दोन शब्द बोलणेही अवघड जात होते.