भावेर गावात जुगार्‍यांचा पोलीस पथकावर हल्ला

0

थाळनेर। शिरपूर तालुक्यातील भावेर गावात जुगार्‍यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जुगार्‍यांनी हल्ला करून दहशत निर्माण केल्याची घटना काल सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास घडली. भावेर गावातील इदगाहजवळ असलेल्या सार्वजनीक जागेवर काही इसम जुगार खेळत होते.

यावेळी किशोर मगन पाटील, इनकलाब देवनाथ भील यांचा देखील जुगार खेळण्यात समावेश होता. या दरम्यान काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता काही जण पळून गेले. मात्र किशोर पाटील, इनकलाब भील हे पोलिसांच्या हाती लागले. त्यांना वाहनात बसवित असतांना त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून पोलिसांना धक्काबुक्की व ओढताण केली. तसेच शर्टफाडून पोलिसांना वाईट शिवीगाळ करीत दमदाटी केली. एवढेच नव्हे तर लोकांना उद्देशून हे दोघे म्हणाले ’यांना धरा, यांची गाडी पेटवा, यांना मारा’ अशी चिथावणी देत दहशत निर्माण केली तसेच सरकारी कामात अडथळा आणला. पोकॉ. सुर्यवंशी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला.