भावे हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशात शिक्षक दिन साजरा!

0

पुणे । भावे हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त पालक-शिक्षक संघातर्फे सर्व शिक्षकांचा पाऊच, पेन, फूल देऊन सत्कार करण्यात आला. पारंपरिक वेशातील 35 विद्यार्थी-शिक्षकांनी ज्ञानदानाचे काम केले. त्यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबतर्फे मंजुश्री देशमुख व एलआयसीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेले बापुसो पाटोळे, विद्या शिंदे, किशोर हिंगसे व ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र नागटिळक यांचा सत्कार प्रशालेतर्फे करण्यात आला.

जनशक्तितर्फे सत्कार
यावेळी एमकेसीएलच्या प्रतिनिधी व कॅड लाइन इंडियाच्या संचालिका सुप्रिया कदम यांनी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सर्व शिक्षकांना गौरविले.
याप्रसंगी जनशक्तिच्या टीमने प्रातिनिधिक स्वरुपात मुख्याध्यापक रोहिदास भारमळ यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले. अध्यक्षा प्रा. वीणा लिमये यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विषद केले. संगीता गारुडकर, उपमुख्याध्यापिका कांता इष्टे, पर्यवेक्षिका भारती तांबे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शाळेमध्ये ‘हर भारतीय ने ठाना हैं; भारत को स्वच्छ बनाना है।’ या संकल्पनेवर आधारित स्वच्छता अभियान सप्ताह राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.