जळगाव। जिल्हा शासकिय रूग्णालयात सर्रासपणे तंबाखू खाणार्या व धुम्रपान करणार्या सतरा जणांविरूध्द गुरूवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली. धुम्रपान करणार्या कर्मचार्यांवरदेखील लक्ष ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई यापुढे देखील राबविली जाईल, अशी माहिती सिव्हीलसर्जन सुभाष भामरे यांनी दिली. गुरूवारी झालेल्या या कारवाईमुळे तंबाखू खाणार्या व धुर्मपान करणार्या रूग्ण व त्यांचे नातेवाईक यासह सिव्हील कर्मचार्यांची भंबेरी उडाली आहे.
रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून होते अस्वच्छता
सिव्हील हे रूग्णांवर निदान करण्याचे जनतेचे हक्काचे दालन आहे. परंत ुरूग्ण,नातेवाईक आणि कर्मचारीच याठिकाणी अस्वच्छता निर्माण करत असल्याचाप्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे गुटखा आणि तंबाखुनेयेथल्या भिंती, स्वच्छता गृहे रंगली आहेत. हा प्रकार रोखण्याच्या अनुषंगाने सिव्हील सर्जन डॉ. सुभाष भामरे यांनी गेल्या काही दिवसांपासूनपथकाची निर्मिती करून धुम्रपानविरोधी मोहिम हाती घेतली आहे.
यांच्यावर झाली कारवाई
गुरूवारी सकाळीच पथकाने सिव्हील परिसर व वार्डांमध्ये तपासणी केल्या आणि तंबाखू खाणार्या व धुम्रपान करणार्यांवर कारवाई केली. दरम्यान, कारवाईत विजय चौधरी, संतोष पाटील, बापू मराठे, राहूल सोनवणे, वसिफ इसाक पटेल, अजेफा शेख अब्दुल , सुनिल जाधव ,जिजाबाई पाटील, निर्मलाबाई पवार, बापू सोनवणे, निर्मलाबाई रामदास, रतन बन्सी, शिवाजी पंडित, भरत परदेशी, संतोष पाटील, सुनिल रामसिंग, राजू पिंजारी या सतराजणांना धुम्रपान करताना रंगेहात पकडून त्यांना प्रत्येकी शंभर तसेच पन्नास रूपयांचा दंड आकारण्यात येऊन कारवाई केली. सिव्हीलसर्जन सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनात पथकातील समउपदेशक दादाजी सोनवणे, सोशल वर्कर राहुल बर्हाटे, रविंद्र पवार, डॉ. गोस्वामी, सिस्टर आर.एम. कवळी, मुकादम मंगेश बोरसे, सुधीर करोसीया, जितेंद्र करोसिया यांनी कारवाई केली.