भिंत कोसळून वृद्धेचा मृत्यू; तिघे जखमी

0

चाळीसगाव। तालुक्यातील हातले व परिसरात आज दिनांक 31 मे 2017 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाला सुरुवात होवुन हातले गावी नवीन बांधकामाची भिंत माती व पत्र्याच्या घरावर कोसळुन मातीच्या घरात एकाच कुटूंबातील 4 जण दाबले गेल्याने त्यात 75 वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला असुन तिघे जण जखमी झाले आहेत जखमीवर चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस पाटील साहेबराव झाल्टे यांनी दिली आहे.

ग्रामस्थांनी मातीच्या ढिगारातून काढले बाहेर
प्राप्त माहितीनुसार दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तालुक्यातील हातले व परिसरात वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली वारा तुफान असल्याने परिसरातील अनेक झाडे उन्मळुन पडली हातले गावी पार्वताबाई बुटा खैरे (75) यांच्या घरा शेजारी नविन बांधकाम सुरु आहे त्या घराच्या छतावरील भिंत या वार्‍या वादळात व मुसळधार पावसात पार्वताबाई यांच्या पत्रे व मातीच्या भिंती असलेल्या घारावर पडल्याने त्यांचे घर कोसळुन मातीच्या भिंतीखाली पार्वताबाई बुटा खैरे (75), मुलगा अंकुश बुटा खैरे (50), सुन वाल्हाबाई अंकुश खैरे (45) व नातु ऋषीकेश (16) हे दाबले गेले हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी मदत कार्य करुन मातीच्या ढिगा-याखालुन चौघांना बाहेर काढले त्यात पार्वताबाई यांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत. वादळी वार्‍यात गावचे सरपंच संजय सिताराम दळवी यांच्या घराचे पत्रे देखील उडुन गेले व ईलेक्ट्रीक पोलच्या तारा देखील तुटल्या आहेत.