भिंत कोसळून 4 वर्षीय चिमुकलीचा दबून मृत्यू

0

पारोळा । तालुक्यातील नगाव गावातील इंदिरा नगरातील भिल कुटुंबिय नविन विटा मातीची बांधलेल्या भिंत बसलेले चौघांवर कोसळल्याने त्यात चार वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली असून जखमींना पारोळा येथील कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील नगाव येथील इंदिरा नगरात रहिवासी विनोद भावलाल भिल (वय-28), सुनील भावलाल भिल (वय-25), आशाबाई झावरू भिल (वय-55), रितू विनोद भिल (वय-4) हे 22 रोजी दुपारी 3.30 वाजता रहाते घराच्या अंगणात बसलेले असतांना नावीनंच विटा मातीची बांधलेली भिंत त्या चौघांच्या अंगावर पडल्याने त्यात रितू भिल ह्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर विनोद कंबरेपासून खाली कामातून गेला तर आशाबाई, सुनील हे ही जबर जखमी झालेत. जखमीवर पारोळा कुटीर रुग्णालयात प्रथमोपचार करून धुळे येथे हलविले. दरम्यान कुटीर रुग्णालयात आमदार डॉ. सतीश पाटील यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस करून तपासणी केली व पुढील उपचारार्थ आर्थिक मदत करून नायब तहसीलदार एन.झेड.वंजारी,विठ्ठल वारकर यांना बोलावून पंचनामा करून मदत करण्याचे सांगितले याबाबत पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ प्रकाश चौधरी हे करीत आहेत. यावेळी माजी सरपंच जयवंत पाटील, प्रवीण पाटील, समाधान पाटील, भाईदास महाले, कैलास पाटील, नवल पाटील, रत्नाबाई महाले आदींनी दबलेल्या कुटुंबाला काढण्यासाठी मदत केली.