नवी दिल्ली : दिल्लीतील पहिल्याच चालकविरहित मेट्रोचा चाचणीदरम्यान अपघात झाल्याने या मेट्रोबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नोएडाला दक्षिण दिल्लीशी जोडणार्या मजेंटा लाइन मेट्रो गाडीने ट्रायल रन घेताना कालिंदी कुंड डेपोजवळ थेट भिंतीला धडक दिली आणि थेट भिंत फोडून बाहेर आली. या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार होते.