भिक मागून उदरनिर्वाह करणारे आजही जगतात अंधारातच!

0

जळगाव । शहरात गेल्या काळा पेक्षा भिक मागणार्‍यांची संख्या अधिक झाली. या मध्ये लहान बालके, महिलाची संख्या अधिक आहे. गेल्या काळात ऑपरेशन मुस्कान जिल्ह्यात राबविण्यात आले. मात्र आता ते थंडावल्या अवस्थेत आहे. मात्र अचानक डोळ्याला कधीचन दिसलेले चेहेरे भिक मागताना दिसत आहेत. यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे काय? हे आहेत कोण? हा सवाल उपस्थित होतो. रेल्वे स्टेशन ,मार्केट परिसर,बस स्थानक अशा विविध ठिकाणी महिला सह बालके आढळून येत आहे. समाज अंधारात आहे.जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

बालकांची भर उन्हात भटकंती
शहरातील वर्दळीच्या बाजार परिसरात लहान बालकाची संख्या भिक मागणार्‍या मध्ये अधिक आहे. बाजार भागात सर्वच स्तरावरील नागरिक खरेदी साठी येत असतात अशा वर्दळी च्या ठिकाणी लहान बालके भिक मागताना आढळून येत आहे. या ठिकाणी नागरिकांनी हटकल्यावर सुद्धा पैशा चा आग्रह

लहानबालकान कडून करण्यात येतो. बर्‍याच वेळा सुटे नसल्यास भिक मागणार्‍या सोबत नागरिकांचा वाद होत असतो. यातच या लहान बालकांना काही वेळेस पैसे मागून न आणल्यामुळे त्यांचे आई-वडील मारहाण करत असल्याच्या घटनाही आता समोर येत आहे.

न्यायालयाच्या आदेशाने ऑपरेशन मुस्कान
केद्र सरकार , न्यायालयाच्या आदेशाने संपूर्ण देशात ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले.ऑपरेशन मुस्कान च्या प्रमुख पदी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतात. पोलिसाच्या विशेष पथका कडून जिल्ह्यात हरवलेल्या तसेच दुसर्‍या जिल्ह्यात स्थानांतर झालेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसा पासून ऑपरेशन मुस्कान मंदावलेल्या अवस्थेत आहे. 2015 -2016 च्या कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली. आता पुन्हा जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान तसेच स्माईल राबविण्याची गरज आहे. जिल्हा बालकल्याण समिती ला सुद्धा या बाबत अधिकार देण्यात आले या समितीच्या प्रमुख जिल्हा अधिकारी असतात सामजिक कार्यात योगदान देणार्‍या मंडळीना या समितीवर घेण्यात येते.

केशवस्मृतीने पोलीस दलाच्या वतीने राबवली मोहीम
जिल्हा पोलीस दल तसेच केशव स्मुती प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दोन वर्षात मोहीम राबविण्यात आली होती. या मध्ये पोलीस अधीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली कुणाल महाजन व स्वयंसेवकानी जुलै 2015 मध्ये जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यावर ऑपरेशन मुस्कान तसेच ऑपरेशन स्माईल घेण्यात आले. या मध्ये एकून 330 बालकांचा शोध घेण्यात यश आले. मात्र भिक मागणार्‍या लहान बालकाची संख्या जिल्ह्यात पुन्हा वाढत आहे.