भिडे, एकबोटेंना अटक झालीच पाहिजे!

0

पुणे । कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. या हिंसाचारात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा सहभाग असल्याची माहिती आणि पुरावे समोर आले असून त्यांना अटक झाली पाहिजे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असे मत केंद्रीय सामाजिक, न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. हिंसाचार प्रकरणी अनेक पुरावे पुढे येत असून शिवप्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीशी संबंधित लोकांची नावे देखील पुराव्यातून पुढे येत आहेत त्यामुळे या कटात भिडे व एकबोटे यांचा सहभाग असावा असे वाटत असल्याचे आठवले म्हणाले.

त्यांनी पक्ष बचाव रॅली काढावी…
हेगडेंनी संविधान बदलण्याची भाषा केली त्यावेळी मी विरोध केला पंतप्रधान नरंद्र मोदी हे संविधानाला त्यांचा धर्मग्रंथ मानतात आम्ङी संविधान बदलण्यासाठी नव्हे तर संविधान मजबर्थीं करण्यासाठी सत्तेत आलो आहेत. सरकार संविधान बदलणार नसून विरोधकांनी त्याची चिंता करू नये 26 जानेवारी रोजी विरोधी पक्षांकडुन संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्याएवजी त्यांनी पक्ष बचाव रॅली काडावी अशी टिका रामदास नाठवले यांनी केली.

जिल्हा पोलिस व जिल्हाधिकार्‍यांची घेतली भेट
भिडे यांचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांशी संबंध आहेत त्यामुळे त्यांना अटक होत नाही. यावर आठवले म्हणाले, मुख्यमंत्री पंतप्रधान यांना अनेक लोक भेटत असतात. सोशल मिडियावर भिडे यांचे त्यांच्या सोबत फोटोे व्हायरल करून भिडेंचे फडणवीस आणि मोदी यांच्याशी संमध असल्याने त्यांची अटक टाळली जात आहे असा प्रचार केला जात आहे. हे चुकीचे असून त्यांच्यासह दंगलीतील इतर सहभागी लोकांना अटक केली जावी, यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. वढु येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीसाठी आणि संभाजी महाराजांच्या समाधीसाठी 20 ते 30 लाखांचा निधी खासदार निधीतून मुख्यमंत्र्यांशी बोलून देणार असल्याचे आठवले म्हणाले.

मंत्रीपद राहणार असेल तरच ऐक्य…
माझे मंत्रीपद जाणार असेल तर रिपब्लीकन ऐक्य काय कामाचे नाही मी जर अजुन दोनच्यार वेळा मंत्री होणार असेल तरच रिपब्लीकरण ऐक्य करावे. रोज गटबाजी करणारेच उठसुट ऐक्याची भाषा करतात .सध्या माझे दिड वर्ष मंत्रीपद राहिले असुन अजुन पुढे 10 वर्ष राहणार आहे. सत्तेत राहुन सर्वसामान्याचे भले करणे हाच आंबेडकरवाद आहे असे आठवले यावेळी म्हणाले.

3 जानेवारीला राज्यात बंद पाळला त्यात माझा पक्ष आघाडीवर होता. प्रकाश आंबेडकर मोठे झाले तर मला आनंद आहेच ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. मी काय कोणाचा नातू नाही मी जनतेतून निवडून आलेला नेता आहे. त्यामुळे मी कागदी वाघ नाही तर ढाण्या वाघ आहे असे ते म्हणाले. मेवानीने नक्षलवाद्यांच्या नादी लागून लाल सलाम म्हणू नये. नक्षलवादातून दलित आदिवासींचे कल्याण होणार नाही. जिग्नेशने दलित कुटुंबांना 5 एकर जमीन द्यावी अशी मागणी आत्ता केली आहे. आम्ही ती 20 वर्षांपूर्वीच पँथरच्या काळात केली होती तसेच मी मंत्री असताना अनेक दलित कुटुंबांना गायरान जमिनी दिल्या आहेत असे आठवले म्हणाले.

नांगरेे-पाटील खोटे बोलतात…
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी कोणती समिती नेमण्यात आली नव्हती, असे स्पष्टीकरण गृहविभागाने दिले आहे. याप्रकरणी विश्‍वास नांगरे पाटील हे खोटे बोलत आहेत असा ओरोप उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केला. यावर आठवले म्हणाले की, या दोघांमध्ये काय बोलणे झाले मला माहीत नाही. मात्र समितीच्या अहवालाची काही गरज नाही पुरावे शोधने पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांचे काही प्रमाणात याप्रकरणात अपयश आहे मात्र नांगरे-पाटील यांनी त्यानंतर कोठे हिंसाचार उसळणार नाही याची दक्षता घेतली अशी सारवासारव आठवले यांनी केली.