भिडे गुरुजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

0

धुळे । राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मनोहर भिडे यांचा निषेध करीत प्रतिकात्मक पुतळा राष्ट्रवादी युवक काँगे्रसने जाळला. यावेळी भिडेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोमवारी शहरात आलेले मनोहर भिडे यांनी एका वृत्तपत्राच्याकार्यालयात भेटी दरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याबद्दल अनुद्गार काढले. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना शरद पवारांचे राजकारण कळले नाही म्हणून राजकारणाची अधोगती झाली. माझ्या बदनामीचे षडयंत्र पवार करीत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

राष्ट्रवादी युवक काँगे्रसने भिडे यांच्या याच वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे महाराणा प्रताप चौकात दहन केले. यावेळी शहराध्यक्ष सचिन आखाडेसह राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ, पदाधिकारी सोमनाथ मोरे, गौतम शिरसाठ, विशाल शिंदे, दीपक धनळे, मंदार भदाणे, पृथ्वी सोनवणे, चिन्मय सोनवणे, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.