जळगाव । घटनेचे शिल्पकार, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, विधिज्ञ अशा विविधांगी प्रतिभेने युक्त विश्वविख्यात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती मंगळवारी 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरी करण्यात आली. शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयातर्फे जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेल्या सप्ताहभरापासून जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. बाबासाहेबांच्या कार्याला व आठवणींला उजाळा देण्यासाठी अनेक संस्था, संघटना सरसावली. शहरात आंबेडकरांची प्रतिमा
फलके लावण्यात आली होती. शहरातील मंडळे, समित्यांतर्फे आंबेडकरांच्या प्रतिमेची शोभायात्रा तसेच मिरवणुक काढण्यात आली. नेहरू चौक, रेल्वेस्थानक परिसर, टॉवर चौकात सजावट करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात ज्ञान दिवस
शासन निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात आली. सामाजिक समता सप्ताहा दरम्यान आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी बाबासाहेबांच्या जीवन प्रसंगातील दुर्मिळ छायाचित्रांवर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. सामाजिक समता सप्ताहाच्या समारोप जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले. डीजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या डिजीधन अभियानाचे औचित्य साधुन जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, झेडपी सीईओ आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, महिला बाल कल्याण सभापती रजनी चव्हाण, आयुक्त जीवन सोनवणे, आरडीसी राहुल मुंडके, समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड, सामाजिक न्याय सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनिल दामले, ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक योगेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी तर आभार समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड यांनी केले.
बाबासाहेबांचे विचार समजुन घेणे गरजेचे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्षविषयक विचार मांडले आहे. आजच्या धर्मनिरपेक्षता या मूल्याला अभ्यासकांनी नीट समजून घेतली पाहिजे. डॉ. आंबेडकर यांनी भारतीय संविधान सभांमधून समाजवाद, धर्मनिरपेक्षता याविषयी मांडलेली भूमिका आणि संविधानातील त्याचा अर्थ नीटपणे समजून घेण्याची गरज आहे असे मत मू.जे. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रा. राजीव पवार यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त मू.जे. महाविद्यालयात आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.एस.डी. जोशी होते. प्रा. संजय हिंगोणेकर, गोपाल बागुल यांनी कविता सादर केल्या. याप्रसंगी डॉ. सी.पी.लभाणे, डॉ.कल्पना नदंनवार, डॉ.जगदीश बोरसे, प्रा.अनिल क्षीरसागर, डॉ.जुगलकिशोर दुबे, प्रा.मनोज महाजन, प्रा.दिलवरसिंग वसावे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश महाले यांनी केले.
प्रकाशगड येथे आंबेडकर जयंती साजरी
महावितरण आणि महा विजनिर्मिती या कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड इमारतीत शुक्रवारी बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी संचालक सुनिल पिंपळखुटे, सर्वश्री शिंदे, चंद्रशेखर येरमे, मुख्य अभियंता चंद्रकांत वाघ, सतिश तळणीकर, संजय ढोके, प्रवीण काळे तसेच महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.
महावितरणतर्फे आंबेडकर जयंती साजरी
महावितरणच्या जळगांव परिमंडळातर्फे शुक्रवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. आंबेडकरांच्या प्रतिमेस मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. अरूण शेलकर विशद केले. याप्रसंगी अधिक्षक अभियंता संजय आकोडे, राजेंद्र म्हंकाळे,नरेंद्र नारायणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुसुदन सामुद्रे , दिपक कोळी यांनी परिश्रम घेतले.
सकारात्मक विचार अंगिकारल्यास राष्ट्रविकास शक्य
एकता, एकात्मता हा संविधानाचा श्वास आहे. जात-धर्माचे बंध तोडावे लागतील आणि सकारात्मक विचारांचे पालन करावे लागेल तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही चतुसुत्री अंगीकारून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत असलेला राष्ट्रविकास भारतीय संविधानाच्या माध्यमातून साकार करता येईल असे मत प्रा.भीमराव भोसले यांनी व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या आणि महात्मा फुले यांच्या 190 व्या जयंतीच्या संयुक्त महोत्सवात आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, साहित्यीक जयसिंग वाघ, प्र.कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.अनिल डोंगरे, प्रा.म.सु.पगारे उपस्थित होते. दुसरे वक्ते जयसिंग वाघ यांनी भारतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेल्या तरतूदींमुळेच देशाला महिला राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच महिलांचा प्रत्येक क्षेत्रात असलेला वावर फक्त भारतालाच शक्य झाला आहे. हे सारे भारतीय संविधानासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे झाल्याचे मत व्यक्त केले. बाबासाहेबांच्या 126 व्या जयंती निमित्त विद्यापीठ परिसरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सहभाग घेतला. विद्यापीठ मुख्यद्वारा पासुन तर प्रशासकीय इमारतीपर्यत ही मिरवणुक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अनिल चिकाटे व आभार प्रा.म.सु.पगारे यांनी मानले. फुले व आंबेडकर जयंतीनिमित्त 11 ते 14 एप्रिल दरम्यान वकृत्व स्पर्धा, रक्तदान शिबीराचे विद्यापीठात आयोजन करण्यात आले होते.
बीएसएनएल वसाहतीत जयंती
शहरातील भारत संचार निगम लिमिटेड कर्मचारी वसाहतीतील टेलीफोन क्वार्टर मित्र मंडळातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी टेलीफोन क्वार्टर मित्र मंडळातील सर्व सदस्य हजर होते. बौध्द भिक्षुक भंते सुगवन्ते यांनी बाबासाहेबांच्या मंत्र उच्चार करुण भगवान बुध्द व बाबासाहेबांची प्रतिमा पूजा केली. सुगवन्ते यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. तसेच जयंती निमित्त मंडळातर्फे स्वच्छता अभियान व सरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
भंगाळे माध्यमिक विद्यालय
युवा विकास फाऊंडेशन संचलित सि.ग.भंगाळे माध्यमिक विद्यालयात व अप्पासाहेब जे.एस. शिंदे प्राथमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर विष्णु भंगाळे होते. भंगाळे यांनी दीपप्रज्वलन करुन बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रफुल्ल सरोदे नरेंद्र बोरस यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन महाजन, विजया चौधरी, अनुपमा कोल्हे, विवेक नेहते, दिपक भारंबे, दिपनंदा पाटील, निखिल नेहेते, सारीका सरोदे, अश्विनी वाघ, दिपाली पाटील, उत्कर्षा सोनवणे, अनिता चिते आदींनी परिश्रम घेतले.
भगीरथ इंग्लिश स्कूल
भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये बाबासाहेबांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माध्यम उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नेतकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आशा चौधरी होत्या. या प्रसंगी एस.डी.भिरुड, नेहा जोशी, श्याम ठाकरे, ए.व्ही. साळुंके, आर.डी.कोळी, एस.पी.निकम उपस्थित होते. रज्येष्ठ शिक्षीका ए.व्ही.साळुंके, दीक्षा बाविस्कार यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी आर.जी. सपकाळे, संगीता पाटील, नरेश फेगडे, राजू क्षिरसागर, नागेश सोनार, ए.एस.पारधे यांनी परिश्रम घेतल. सुत्रसंचालन अशोक पारधे यांनी केले.
मिरवणुकीत विविध देखावे
सकाळी 7 वा पासून सुरु झालेल्या मिरवणुकाचा समारोप रेल्वे स्थानक परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ करण्यात येत होता. मिरवणुकी मध्ये बौद्ध धर्मांच्या विविधतत्वज्ञानाची महती सांगणारे देखावे सादर करण्यात आले. मोठ्या जल्लोष पूर्ण वातावरणात भीम गीतांनी सुवर्ण नगरी न्हाऊन निघाली होती. मरहूम हाजी सईद मलिक बाबा बहुद्देशीय संस्था व राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्याक आघाडीतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिम्मिताने मोफत पाणी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी संस्थेचे गफ्फार मलिक,नदीम मलिक ,युसूफ खान,तणविर शेख,मुस्ताक शेख शेरा खान ,हुसेन पेंटर आदी उपस्थित होते. उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मा मुळे, जगात वाजागाजा भीमराव एकच राजा, बाबासाहेबांचा विजय अशा घोषणा देण्यात आल्या.
नेवे यांना आंबेडकर साहित्य रत्न पुरस्कार
जळगाव येथील सत्यशोधकी साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदतर्फे गुरुवारी 13 रोजी बबन बाहेती महाविद्यालयात कवि संमेलन आयोजित करण्यात आले. कवि संमेलनाचे औचित्य साधून अध्यक्षा सुशिला पगारिया, विजयाकुमार मौर्य, डॉ. मिलिंद बागुल यांच्याहस्ते दिव्यांग किशोर नेवे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. नेवे हे यमुना फाऊंडेशनचे सचिव, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य कला परिषद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वृक्षारोपन संरक्षण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक गोविंद देवरे, प्रल्हाद खरे, भास्कर चव्हाण, गणेश पाटील, भटू जोशी, विजय सैतवाल, राजेंद्र वाणी, दत्तू भदाणे, सचिन खैरनार, प्रकाश सोनगीरे उपस्थित होते.
महामानवास भाजपातर्फे अभिवादन!
भारतीय जनता पार्टी महानगर पार्टीच्या महानगर शाखेकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुळ्यावर अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आमदार राजुमामा भोळे, खासदार रक्षा खडसे , ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ , महिला आघाडीच्या जयश्री पाटील ,नगरसेवक सुनील माळी ,विशाल त्रिपाठी ,अमित चौधरी ,सुनील भालेराव आदी पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण
शहरात विविध ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राजकीय पक्षांनीही सहभाग घेतला. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अॅड.रविंद्रभैय्या पाटील व महिला जिल्हाध्यक्ष विजया पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी वाय.एस. महाजन, विकास पवार, विजया पाटील, योगेश देसले, वाय.एस. महाजन, कल्पना पाटील, मिनल पाटील, कल्पिता पाटील, रोहन सोनवणे, अॅड.सचिन चव्हाण, अॅड. सचिन पाटील, अॅड. राजेश गोयर, संजय चव्हाण, सलिम इनामदार, संदिप पवार, जयप्रकाश महाडिक, गणेश निंबाळकर, किशोर पाटील, राजु बाविस्कर, जगतराव पाटील, सतिष चव्हाण कार्यकर्ते उपस्थित होते.
विश्वगर्जना ढोल पथकाने वेधले लक्ष
भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने विश्वगर्जना ढोल पथकाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलासह युवक निळा फेटा बांधून सहभागी झाले होते. एकूण 50 महिलांचा ढोल पथकामध्ये सहभाग होता. शहरातल्या प्रमुख मार्गावरून ढोल पथकाने विविध प्रात्यक्षिके सादर केलीं. नागरिकाची ढोल पथकाला बघणार्यांची मोठी गर्दी महापालिका परिसरात झाली होती. डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ ढोल पथकाने सादरीकरण केल्या नंतर समारोप करण्यात आला.