भिलपुर्‍यातील साडे तीन हजार नागरिकांचा पाणी बचतीचा संकल्प

0

नियाज अली भैय्या मल्टीपर्पज फाऊंडेशनतर्फे कार्यक्रम

जळगाव- शहरातील नियाज अली भैय्या मल्टीपर्पज फाऊंडेशनतर्फे भिलपुरा चौकात पाण्याचे महत्व या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. यादरम्यान साडे तीन हजार स्त्री पुरुषांनी पाणी वाचविण्याचा संकल्प केला.
उन्हाळ्यात जळगावकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाऊसही अत्यल्प प्रशासनाच्या उपाययोजनाही तोकड्या पडत असतात. प्रत्येकाला उपलब्ध पाणी साठ्यावरच समाधान मानावे लागते. त्यामुळे भविष्यातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने आत्तापासून पाण्याची नासाडी थांबवावी, पाणी वापराबाबतचे योग्य नियोजन करावे यासाठी नियास अली भैय्या मल्टीपर्पज फाऊंडेशनतर्फे भिलपुरा चौकात 22 रोजी पाण्याचे महत्व या विषयावर कार्यक्रम झाला. याप्रसंगी अयाज अली नियाज अली, असलम अशरफी, राहूल चौधरी, शेख शफी, शेख असगर, नूर मोहम्मद, शेख नजारोद्दीन शेख, सलीम शेख कुबीन, शेख अरशद, फराज अली, असराह शाह, जुबेर रंगरेज, मोहम्मद कलीम शेख, नाजीम पेंटर, रियाज अली आदी उपस्थित होते.
ाण्याची नासाडी थांबवा
नियास अली भैय्या मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष अयाज अली नियाज अली यांनी मनोगतातून सांगितले की, जल ही जीवन है. पाण्या शिवाय भूतलावरील कोणीही सजीव जिवंत राहू शकत नाही. गरजेपेक्षा जास्त पाणी वापरु नका, त्याची नासाडी करु नका. भविष्यातील समस्या लक्षात घेवून प्रत्येकाने आत्तापासूनच पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी ईश्‍वराच्या साक्षीने परिसरातील 3 हजार 500 नागरिकांनी पाणी बचतीचा संकल्प केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती