भिलीस्थान टायगर सेनेचे तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन

0

तळोदा । अक्कलकुवा तालुक्यातील विकासकामे खुंटले असून अधिकार्‍यांची मनमानी सुरू आहे. आदिवासी समाजाची लूट होत असून लूट करणार्‍या गटविकास अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भिलीस्थान टाईगर सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले आहे. न्याय मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पाच दिवसांचा अल्टिमेटम
तालुक्यातील अंगणवाडी बांधकामाची चौकशी करण्यात यावी. शौचालय कामाची सखोल चौकशी करण्यात यावे. असे निवेदन देण्यात आले. व कामाची चौकशी आदेश येत्या 5 दिवसाच्या आत देण्यात यावे, अन्यथा भिलीस्थान टाईगर सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरण्यात यावे. निवेदन देताना भिलीस्थान टाईगर सेनेचे तालुकाध्यक्ष रुपसिंग टी. वसावे गुलाबसिंग वसावे, युवाध्यक्ष . भिलीस्थान टाईगर सेनेचे उपाध्यक्ष संतोष के तडवी, नरपत वसावे,व तालुक्यातील भिलीस्थान टाईगर सेनेचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते

विकास खुंटल्याचा आरोप
तालुक्यातील लोकांना गुजरातला स्थलांतर व्हावे लागले आहे. यामुळे गावात कुठल्याही विकास कामे झालेली नाही व लोकांना गावात रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शासनाकडून कोट्यावधी निधी हा ग्रामीण भागासाठी खर्च केला जातो मात्र यात बोगस कामे दाखवून निधी हडपण्याच्या प्रकार या तालुक्यात झालेले दिसून येत आहे. व अधिकार्‍यांची मनमानी कारभार सुरु आहे. तालुक्यातील लोकांना गोठ्याचे लाभ देण्यात येत आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून फाईल कार्यालयात धूळ खात असून लाभार्थ्यांकडून पाच हजार रुपये घेवून आदेश देण्यात आले आहे.

या आहेत मागण्या
आदिवासी समाजाची लुट करण्या-या या गटविकास अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.पंचायत समिती अक्कलकुवा यांचे मार्फत पूर्ण कामाची सखोल चौकशी व्हावी. पाणीपुरवठा साठी 5 टक्के पेसा निधीतून गावासाठी किती हातपंप टाकण्यात आले. 14 वित्त आयोग निधीतून काय करण्यात आली.रोजगार हमी योजने अंतर्गत कोणती कामे झाली. कोलविमाल ते कंकाळामाळ या रस्त्याची कसून चौकशी करणे. जाब कार्ड चेक करून लाभाची चौकशी व्हावी.