भिलीस्थान टायगर सेनेतर्फे रास्ता रोको

0

नवापुर । नवापुर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाना सुविधा मिळत नसल्याबाबत आज भिलीस्थान टायगर सेना मार्फत मोर्चा काढुन उपजिल्हारुग्णालया समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी पुतळयाला बी.टी.एस.महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रविंद्र पाडवी व बी.टी.एस.चे युवा अध्यक्ष अजय गावीत यांनी पुष्पहार अर्पण करुन आई देवमोगरा मातेचे पुजन करुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. आदिवासी ढोल वाद्यासहीत लाईट बाजार येथुन महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्या जवळ आला. येथे डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करुन मोर्चा साईमंदीर रोड कॉलेज रोडाजवळ मार्गावरुन जात स्व.हेमंलताताई वळवी यांचा पुतळ्या जवळून मोर्चा राष्ट्रीय महामार्ग 6 जवळ असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात धडकला. महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन केल्याने रस्त्याचा दोन्ही बाजुने वाहनांची मोठी रांग लागली.

यांची होती उपस्थिती
संघटनेचे अध्यक्ष रविंद्र पाडवी, अजय गावीत, धवल चौधरी, वाडया गावीत, अमोल वसावे, दिनेश मावची, नितेश सोलंकी, विजय गावीत, बटेसिंग नाईक, भद्रेश वसावा, विनेश गावीत, संजय मावची, स्टिपन वसावे, राजेंद्र पाडवी, प्रल्हाद गावीत, दिविसिंग वळवी, संजय माळी, रसिलाल कोकणी, धनसिंग गावीत, महेश मावची उपस्थित होते.

चोख बंदोबस्त
या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणुन पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत,सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा,संतोष भंडारे,दिपक पाटील,ताथु निकम, संगिता कदम,पो.का.निजाम पाडवी, मोहन साळवे, दिलीप चौरे, योगेश थोरात,महेंद्र नगराळे, साहेबराव खाडेकर, जितेंद्र तोरवणे, अनिल राठोड.रितेश इंदवे, प्रविन मोरे,आदीनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रास्ता रोको आंदोलन 1 तास सुरु असल्यामुळे हार्यवेवर वाहऩांचा मोठया रांगा लागल्या होत्या.

सुविधेपासून वंचीत
आदीवासी भाग असल्याने रुग्णांची संख्या मोठी असते. 27 एप्रिल रोजी तहसिलदार यांना रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले. दीड महिना उलटुनही रुग्णालयात सुविधा उपलब्ध केले जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी तहसिलदार प्रमोद वसावे, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील शल्यचिकित्सक डॉ.राजेश वसावे, डॉ.राजेश वळवी, नवापुर उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.अविनाश मावचे यांना निवेदन देण्यात आले.

डॉक्टर निवासस्थानी राहत नाही
नंदुरबार जिल्हा हा पुर्णतः आदीवासी भाग असल्याने आदीवासी समाज बांधव हे जंगलातच राहत असतात. उपजिल्हा रुग्णालयात फक्त अतितात्काळ सेवेसाठी केवळ चार डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यांना निवासस्थान देण्यात आले आहे. परंतु एकही वैद्यकीय अधिकारी त्याठिकाणी वास्तव्यास राहत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अतिप्रसंगाच्या वेळी रुग्णांचा जीवावर बेतण्याची परिस्थिती याठिकाणी आहे. ब्लड बँकेची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे. आदिवाशी बांधवाना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.