नंदुरबार । भिलीस्थान विकास मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार बिरबल वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिलीस्थान विकास मोर्चाचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग वसावे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी भिलीस्थान विकास मोर्चाचे राज्य सचिव अरूण रामराजे, भिलीस्थान टायगर सेनेचे राज्य सचिव अर्जुन जी. पवार, भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमोद जी.नाईक आदी उपस्थित होते. या पदाच्या माध्यमातून आदिवासी, दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक समाजाच्या अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येतील व लोकशाही मार्गाने भिलीस्थान विकास मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी भर देण्यात येईल, असे राजकुमार वळवी यांनी यावेळी सांगितले.