भिल्लीस्थान टायगर सेना एक विचारधारा ः चुकीच्या काम करणार्‍यांची हकालपट्टी

0

राष्ट्रीय उपाध्यक्ष परेश वसावा : पदाचा दुरुपयोग केल्यास कारवाई करणार

नंदुरबार- भिल्लीस्थान टायगर सेना एक विचारधारा आहे. संघटना गोरगरीब, आदिवासी, दलित व मागासवर्गीयांच्या नेहमी पाठिशी उभी राहिली आहे. गत काळात संघटनेत पदाधिकार्‍यांनी अनेक चुका करून ठेवल्या आहेत त्यांची आज हकालपट्टी करण्यात आलेली असून, संघटनेच्या नावाने कोणीही पदाचा दुरुपयोग केल्यास ते खपून घेणार नसल्याचा इशारा राष्ट्रीय उपाध्यक्ष परेश वसावा यांनी दिला. भिलीस्थान टाईगर सेनेची राज्य कार्यकारणी गठीत करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर भारतीय ट्रायबल पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री शैलेश वाळेकर, राष्ट्रीय संयोजक के. मोहन आर्य, गुजरात राज्याचे कोषाध्यक्ष ड. राजेश देवरे, सागबारा जिल्हा परिषदेचे सदस्य कांतीलाल वसावा, सुरेश वसावा, सदानंद वसावा उपस्थित होते प्रास्ताविक प्रमोद नाईक यांनी केले. प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.