भिवंडी(रतनकुमार तेजे ): भिवंडी महानगर पालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी पुढाकार घेतला असून कॉग्रेस ,समाजवादी पक्ष ,बसपा आरपीआय पक्षाशी आघाडीची बोलणी सुरु केली आहेत आगामी निवडणूक महाआघाडीच्या वतीने वाढल्यास जातीयवादी पक्षांना चाप बसून भिवंडीचा सर्वागीण विकास घडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष पुढाकार घेईल अशी माहिती गणेश नाईक यांनी भिवंडीत आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली.
भिवंडी शहर महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २४ मे ला होणार आहे तर २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षच्या वतीने पक्ष प्रवेश व कार्यकर्त्यांचा मेळावा शहरातील समद नगर येथे आयोजित केला होता यावेळी अल्पसंख्याक विभागाचे माजी चेअरमन पक्ष निरीक्षक नसीम सिद्दीकी माजी खासदार संजूव नाईक जिल्हाध्यक्ष शेख खालिद गुड्डू ,सिडकोचे माजी चेअरमन प्रमोद हिंदुराव ,महादेव चौघुले ,इरफान भुरे नगरसेवक भगवान टावरे ,अनिल फडतडे ,आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते या वेळी ,कॉग्रेसचे नेते संगीत मोमीन ,माजी नगरसेवक हसमेन फारुकी ,मनसेचे हमीद शेख ,कामरण शेख यांच्या सह काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला गणेश नाईक यांनी त्यांचे स्वागत करून पक्षामध्ये सन्मानाने न्याय दिला जाईल असे सांगून नाईक यांनी भिवंडीतविकासाच्या मुद्यांवर पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले शिवसेना -भाजप पक्षाची लाट रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे या साठी समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अबू असीम आजमी ,कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण व इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी सुरु आहे त्यामुळे हि निवडणूक महाआघाडीच्या वतीने लढविण्याचे संख्येत नाईक यांनी दिले आघाडी न झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले