भिवंडीत उधारीवरून चार वर्षीय मुलीचा निर्घृण खून

0

भिवंडी :- उधारीवरून एका चार वर्षीय मुलीचा हात कापून तिचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी भिवंडीमध्ये घडली. अवघ्या १५०० रुपयांच्या पानटपरील झालेल्या उधारीवरून पायल प्रसाद हिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

महादेव प्रसाद यांच्या टपरीवरून आबेद शेख याने पान, विडी घेतल्याची त्याच्यावर १५०० रुपयाची उधारी होती. यावरून महादेव आणि आबेद यांच्यात उधारीवरून वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. याचा राग मनात धरून आबेद शेख याने पायल हिचा खून केला. पोलिसांनी या घटनेचा छडा लावत आबेदला अवघ्या ७२ तासामध्ये बिहार येथून अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे मृत पायलचे छाटलेले हात अद्याप सापडले नसल्याने त्याने त्याचे नेमके काय केले याचा शोध पोलीस घेत आहेत.