भिवंडीत कारच्या धडकेत तीन साईपदयात्री गंभीर जखमी

0

भिवंडी : मुंबई ते शिर्डी पायी चालत जाणार्‍या साई पालखी पदयात्रींना कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन पदयात्री गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी मुंबई नाशिक महामार्गावरील माणकोली नाका येथे घडली आहे.जखमी साईभक्तांना कोनगांवच्या धनवंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.सुजित साईनाथ ताजने (२५ रा.चिंचपोकळी) ,नितेश कांबळी (२१) व विजय रोहे (२२ रा. भायखळा) अशी जखमी साईभक्तांची नांवे आहेत.हे तिघेही भायखळा येथील साई मंडळाच्या पालखीसोबत शिर्डीला जाण्यासाठी निघाले होते. साईपालखी मुंबई – नाशिक महामार्गावरील माणकोली नाक्याच्यापुढे अरुणकुमार क्वारी समोर असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ईको कार चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून पदयात्रींना धडक दिली.या धडकेत सुजित ,नितेश व विजय हे तिघे पदयात्री गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी धनवंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.या अपघाताचा कारचालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.