भिवंडी : कल्याण मार्गावरील गोवे येथील ओमसाई या फायबर कारखान्याला गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने या आगीत कारखान्यात साठा केलेले लाखो रुपयांचे फायबर जळून खाक झाले आहे.कारखान्याला लागलेल्या आगीत केमिकलने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने या भीषण आगीत संपुर्ण कारखाना जळून खाक झाला आहे.या आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कल्याण डोंबिवली व भिवंडी महापालिकेच्या दोन अग्निशमन गाड्यांसह दोन टँकर व स्थानिकाच्या मदतीने दोन तासात या भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.या आगीच्या घटनेची नोंद कोनगांव पोलीस ठाण्यात केली आहे.