ठाणे – मुंबईत कामगार रुग्णालयाला लागलेल्या अग्निकांडाचे सत्र अद्याप सुरूच असतांना आज दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास भिवंडीतील काल्हेर परिसरातील राजलक्ष्मी कंपाउंड येथे भीषण आग लागली. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाचे १ फायर वाहन व ठाणे अग्निशमन केंद्राचे बाळकूम येथील १ जंबो वॉटर टँकर, वागळे अग्निशमन केंद्राचे १ फायर वाहन दाखल झाले आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. पुठ्याचे गोदाम असल्याने आगीचा भडका वाढला आणि आग पसरत गेली. मात्र, अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.