भिवंडी : अजय नगर मातृ मंदिर येथे राहणारे व्यापारी विवेक सिंधानिया यांनी आपली गाडी इमारतीखाली उभी केली होती. तद्नंतर काही कामासाठी इमारती खाली आले असता जागेवर गाडी न दिसल्याने गाडीची चोरी झाली म्हणून निजामपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसर्या घटनेत नझराना परीसरात निलकमल सोसायटी आहे. सदर इमारतीलगत दिलीप कोठारी यांनी आपली गाडी उभी केली होती. त्यांना सुद्धा इमारतीखाली आल्यानंतर आपली गाडी दिसून आली नाही. याप्रकरणी गाडी चोरीला गेल्याची तक्रार निजामपुरा पोलीस ठाण्यामध्ये नोंदविली आहे. तिसर्या घटनेत गैबीनगर भागात रियाज खान यांनी आपली दुचाकी उभी करून कामानिमित्त निघून गेले असता अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत गाडी पळविली. रियाज खान यांना जागेवर गाडी न दिसल्याने चोरीची फिर्याद शांतीनगर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.