भिवंडी । आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यात शिवसेनेला धक्का बसला आहे. कारिवली व कालवार ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी शिवसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खासदार कपिल पाटील यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन लक्षात घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत कारिवलीच्या सरपंच कविता गीतेश नाईक, शिवसैनिक गीतेश रामदास नाईक यांच्यासह कारिवलीतील शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
शिवसैनिक भाजपमध्ये
कालवारच्या सरपंच अर्चना परशुराम म्हात्रे, शिवसैनिक परशुराम म्हात्रे, प्रकाश म्हात्रे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे देवानंद पाटील, रमेश पाटील, विनोद म्हात्रे यांनी शिवसैनिकांना विकासाचा मुद्दा पटवून दिला.