भिवंडी ( रतनकुमार तेजे ): भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका २४ मे रोजी होणार असल्याने या निवडणुका लढविण्यास एम.आय.एम पक्ष पूर्णपणे सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.त्यांनी मुस्लिम मोहल्या मध्ये जाऊन पक्ष कार्यकर्तेचे बैठका घेऊन मोर्चा बांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत २४ उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा एम आय एम पक्षाने केली आहे तसेच प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी २९ एप्रिलला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी हे भिवंडी येणार असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरन आहे एम आय एम मुले मुस्लिम मताचे विभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेना -भाजप याना होणार आहे तर याचा फटका काँग्रेस-समाजवादी -राष्ट्रवादी कॉग्रेस सह अन्य पक्षांना बसणार आहे.त्यामुळे राष्ट्रवादी,समाजवादी पक्षासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सतर्क झाले आहेत.दरम्यान काँग्रेससह सवँच पक्षाचे पदाधिकारी नाराज नगरसेवक,कार्यकर्ताना आपल्या पक्षात येणयाचे निमंत्रण देऊन फोडाफोडीचे राजकारण करू लागल्याने भिवंडीत मोठी हाणामारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून सवँत्र लक्ष ठेऊन आहेत.
भिवंडी शहर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका २४ में मध्ये होत आहेत . पालिका प्रशासन व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठक घेऊन निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.गत विधानसभेचा निवडणूकीत एम आय एम पक्षाला प्रथमच भिवंडी पुवँ आणि भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघात सुमारे 20 हजाराहुन अधिक मतदान मिळवण्यात यश प्राप्त केल्याने मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण होते .एम आय एम पक्षाने मुस्लिम मतदारांची मत मिळवल्याने भाजप, समाजवादी,काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना जोरदार फटका बसुन त्यांना तीन हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता.त्यामुळे आता महानगरपालिकेचे निवडणूकीत आपल्या उमेदवारांना फटका बसु नये या साठी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस,समाजवादी,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सतर्क होऊन एम आय एम पक्षाचे दररोज होणाऱ्या बैठकांकडे लक्ष ठेऊन आहे. भिवंडीत कांग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष यांच्या मनमानी कारभारा मुले कॉग्रेस चे काही पदाधिकारी व कार्यकर्ते गटबाजी करुन पॅनल तयार करीत आहेत. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते तीव्र नाराज असून 12 पदाधिका-यांनी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे कडे राजीनामे देऊन त्यांनी एम आय एम पक्षाचे प्रमुख हैदराबादमधील असुद ओवैसी यांचेशी थेट संपर्क करून निवडणूकी बाबत विशेष बैठक केली असल्याचे एका पदाधिका-याने सांगितले.
त्यामुळे काँग्रेस पक्षाला टक्कर देण्यासाठी एम आय एम सज्ज झाली आहे.समाजवादी व काँग्रेस मधील गटबाजीचा फायदा घेण्यासाठी शिवसेना,भाजप पक्षाचे पदाधिकाऱी सतर्क झाले असुन आमचा पक्षात येण्याचे आमंत्रण आँफर देत असल्याचे समजते. कॉग्रेस पदाधिका-यांनी सुध्दा समाजवादी,शिवसेना नगरसेवक व कार्यकर्त्यांशी संपर्क सुरु करून फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .भिवंडी पालिकेत शिवसेना काँग्रेस आघाडीची सत्ता असल्याने त्यांना शह देण्यासाठी भाजपासह अन्य पक्ष सतर्क झाले आहेत.
भिवंडी महानगर पालिकेच्या नवीन 23 प्रभागां मध्ये पक्षांचे उमेदवार उभे करण्यासाठी भाजप, शिवसेना समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एम आय एम आणि काँग्रेस पक्ष्याने चाचपणी करून जोमाने तयारी सुरु केली आहे.
उत्तरप्रदेश सह अन्य ठिकाणी भाजपाला यश मिळाल्यामुले भाजपा खासदार कपिल पाटिल आमदार महेश चौघुले भिवंडीत जोरदार मोर्चा बांधणी करत असल्याने त्यांना रोखण्यासाठी आता शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील ,आमदार रुपेश म्हात्रे ,आमदार शांताराम मोरे ,शहर प्रमुख सुभाष माने , ठाणे ग्रामीण संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे ,सचिव दिलीप नाईक ,यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची तयारी सुरु केली आहे तर काँग्रेस,समाजवादी पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मोर्चा बाधणी करत आहे.
भिवंडी शहरातील पालिकेतील भ्रष्ट कारभार, टोरेंट पॉवर कंपनी, यंत्रमाग पावरलुम उद्योग तसेच खराब रस्ते,पाणी,अस्वछता,झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला त्रास भोगावा लागत आहे. या प्रश्नाचा प्रचाराचा मुद्दा बनवत भाजप,काँग्रेस,समाजवादी,एम.आय.एम पक्ष, भिवंडीत प्रचाराचा धुरळा उडविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले