भिवंडी महापालिकेच्या निवडणूक याद्यांमध्ये घोळ केल्याने ११ लिपिक निलंबित

0

भिवंडी ( रतनकुमार तेजे ): भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच पालिकेच्या लिपिक कर्मचाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार प्रभाग रचनेनुसार मतदार याद्या तयार न करता स्थानिक नगरसेवकांशी आर्थिक साटेलोटे करून मतदार याद्यांमध्ये घोळ केल्याचे उघडीस आल्याने पालिका आयुक्त डॉ.योगेश म्हसे यांनी तडकाफडकी अकरा लिपिकांवर शुक्रवारी सायंकाळी निलंबनाची कारवाई केली आहे.

व्ही.आर.पाटील ,गौतम जाधव, अरुण कदम ,सुनिल पाठारी ,गणेश विभुते,पंडित भोईर ,रमेश गायकवाड ,मोहन जाधव ,प्रमोद जाधव ,गजानन पाटील ,दिपक बोपटे असे निलंबित केलेल्या लिपिकांची नांवे आहेत.या सर्वांनी विविध प्रभागांमध्ये मतदारांच्या नांवांची भौगोलिक रचना लक्षात न घेता उलटसुलट याद्या जोडून मतदार याद्यांमध्ये घोळ केला आहे.याविरोधात भाजपचे प्रदेश प्रतिनिधी श्यामभाई अग्रवाल ,संजय काबुकर ,फाजील अंसारी ,सिद्धेध्वर कामूर्ती आदींसह अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.