हडपसर । लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त महारिषदेच्या वतीने सारस बागेत विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राचे प्रसिद्ध भीमशाहीर राजेंद्र कांबळे (कडुसकर) यांना श्री रंगनाथ नाईकडे (आइ. एफ. एस. अधिकारी) यांच्या हस्ते कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मातंग युवा परिषदेचे अध्येक्ष संजय आल्हाट, माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे, जेष्ठ साहित्यिक संपत जाधव, शाहीर गफूरभाई पुणेकर, अमर पुणेकर, अशोक कांबळे, एल. डी. भोसले, अंकल सोनावणे, विजय बाहुले, विजय गायकवाड, श्रीनाथ अडागळे, हरिभाऊ वडमारे, कन्हैया पाटोळे, मंगेश कांबळे, प्रदीप कांबळे, प्रमोद राजगुरू, दामू चौधरी, अशोक भिसे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.