पिंपरी : झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन कार्यालयास पूर्णवेळ सहायक आयुक्त देण्यात यावेत, या मागणीसाठी भीमशाही महिला संघटना आणि भिमशाही युवा संघटनेने कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. विठ्ठलनगर, नेहरुनगर विभागातील कर्मचारी नागरिकांना सतत उडवा-उडवीची उत्तरे देतात. नागरिकांची कामे करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असा आरोप करण्यात आला. आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे, सचिन गायकवाड, सलीम कुरेशी, संभाजी जावळे, सूर्यकांत जावळे, सुंदर जावळे, युवराज उदागे, रघुनाथ म्हस्के, पोपट सोनवणे, सचिन डोंगरे, सुमित्रा गायकवाड, वर्षा जावळे, शांता जाधव, कांताबाई डोंगरे, छब्बु वाघमारे, अनिता म्हस्के आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.