येरवडा : येरवडा प्रभाग क्र.6 मध्ये भीमाशंकर वसाहतीतून ड्रेनेज लाइन टाकण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका गटनेते संजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या ड्रेनेज लाइनच्या कामासाठी कामासाठी पीडब्लूडी खात्याकडून परवानगी हवी होती ती मिळाल्यामुळे मदर तेरेसा, भाटवस्ती, यशवंतनगर, कामराजनगर येथील अनेक वर्षांपासूनचा ड्रेनेजचा प्रश्न सुटणार आहे. यावेळी नगरसेवक अविनाश साळवे, नगरसेविका श्वेता चव्हाण, नंदूशेठ मोझे, आनंदशेठ गोयल, संजय वाल्हेकर, सुनील साधू नीता अडसुळे, श्रीशेठ चव्हाण, यशवंत शिर्के, किशोर पाटील, दिलीप महादे आदी उपस्थित होते.