भीमा-कोरेगावला जमलाय लाखोंचा जनसमुदाय !

0

पुणे-कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक काल रात्रीपासूनच पोहोचले आहेत. लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी आहे. गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली असून सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले. अद्यापपर्यंत दंगल घडवणार्‍यांवर सरकारकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे समाजात तेढ निर्माण कसा होईल आणि दंगली कशा घडतील. हेच सरकार पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील वर्षाची येथील घटना लक्षात घेता कोणत्याही प्रकारची घटना घडू नये, याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी, असे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातील विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. दरम्यान, गतवर्षीपेक्षा यंदा विजय स्तंभाच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे.