पुणे- कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक येणार आहे. काहीही झाले तरी मी देखील याठिकाणी जाणार असल्याची भूमिका भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी घेतली आहे. नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर ते रविवारी रात्री आझाद यांचे पुण्यात आले. पुणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुण्यातील सभेला येथील प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष या निर्णया विरोधात न्यायालयात गेले आहेत. या बाबतचा निर्णय आज येणार आहे. आमच्या बाजूने निर्णय आल्यास आम्ही सभा घेऊ जर आमच्या विरोधात निर्णय गेल्यास आम्ही नागरिकांमध्ये जाऊन आता पर्यंत घडलेला प्रकार सांगू असे चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले.