भीमा-कोरेगाव घटनेतील आरोपी प्रा.शोना सेन यांचे नागपूर विद्यापीठातून निलंबन

0

पुणे-कोरेगाव भीमा हिंसाचारात सहभाग असल्याच्या कथित आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या नागपूर विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापिका शोना सेन यांच्यावर विद्यापीठ प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. सेन सध्या पुणे पोलिसांच्या कोठडीत आहेत.

नक्षलवाद्यांसी संबंध

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोरेगाव भीमा येथील हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या लोकांना अटक केली होती. यामध्ये शोमा सेन यांच्यासह सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांना वेगवेगळ्या शहरांमधून ताब्यात घेतले. यांचे नक्षलवाद्यांसी संबंध असल्याकारणाने त्यांच्यावर पहिल्यापासूनच पोलिस नजर ठेऊन होते. दरम्यान, अटकेची कारवाई झाल्याने आता नागपूर विद्यापीठाने शोमा सेन यांच्यावर कठोर कारवाई करीत त्यांचे निलंबन केले आहे.

दरम्यान, शोमा यांची मुलगी कोयल सेन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची आई मानवाधिकार कार्यकर्त्या असून त्या दलित कार्यकर्त्याही आहेत. शोमा यांना यापूर्वी कधीही अटक करण्यात आली नव्हती तसेच त्यांची कुठलीही चौकशीही करण्यात आलेली नाही असेही कोयल सेन यांनी सांगितले आहे. दलितांच्या अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्या लोकांना गप्प करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या देशातील राजकीय वातावरण असे झाले आहे की, कथित खालच्या समाजातील लोकांचे म्हणणे ऐकण्यासाठी कोणीही तयार नाही, तसेच ते जेव्हा बोलायला लागतात तेव्हा त्यांना खाली पाडण्याचे काम केले जात असल्याचा आरोप कोयल सेन यांनी केला आहे.