भीमा-कोरेगाव: जनतेने सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये-जिल्हाधिकारी

0

पुणे- १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव शौर्यदिन आहे. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे लाखो जनसमुदाय याठिकाणी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमणार आहे. मागील वर्षी हिंसाचार भडकला होता. यावर्षी तशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने दखल घेतली असून मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जनतेने सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच खोटे संदेश पाठवू नये असे आवाहन केले आहे.

मागील वर्षी झालेल्या हिंसाचारामुळे यावर्षी १०-१५ पट अधिक सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.