नोएडा: पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. हे प्रकरण संपूर्ण देशात चर्चेत होते. दरम्यान आता या प्रकरणात उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका संशयिताच्या घराची चौकशी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी नोएडा येथे जाऊन ही कारवाई केली आहे. अगोदर या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे.