भीमा कोरेगाव प्रकरण: झारखंडमधून एकाला अटक

0

नवी दिल्ली : २०१८ साली महाराष्ट्राच्या कोरेगाव भीमामध्ये जातीय दंगली उसळली होती. त्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणात माओवाद्यांचा संबंध असल्याच्या शंकेने तपास सुरु आहे. दरम्यान भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात एनआयएने आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडमधून अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा एनआयएच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. फादर स्टेन स्वामी यांना नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. जवळपास २० मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली. आज शुक्रवारी स्वामी यांना एनआयए न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

फादर स्टेन स्वामी यांना रिमांडवर घेतले जाऊ शकते किंवा ट्रान्झिट रिमांडवर त्यांना दिल्लीला आणले जाऊ शकते. स्वामींची या अगोदर २७-३० जुलै आणि ६ ऑगस्टलाही एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांच्या चौकशीनंतर आपल्यावरचे सगळे आरोप स्वामी यांनी फेटाळले होते.

‘फादर स्टॅन स्वामी यांची आदिवासींच्या अधिकारासाठी लढा देणारे म्हणून ओळख आहे.